सातारा : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर; किसन वीर कारखान्याचा सुरक्षिततेसाठी पुढाकार

सातारा : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यातर्फे शुक्रवारी वाहनधारकांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी वाहनांची दृश्यमानता वाढवून अपघातांचा धोका कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. “जीवन अनमोल आहे. आयुष्याला ‘वन्स मोअर’ मिळत नाही. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी,” असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले.

कारखाना व्यवस्थापनाकडून ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात येत आहेत. रिफ्लेक्टरमुळे रात्रीच्या वेळी तसेच कमी प्रकाशात वाहनांची ओळख सहज होऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॅक्टर मुंगळा गाड्या आणि बैलगाड्यांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुईंज येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर, कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे आणि कार्यकारी संचालक उत्तम पाटील यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी वाहतूक पोलीस जी. जी. बाकले, प्रशांत शिंदे, राजेंद्र भोसले, सुधीर गायकवाड, अमोल बाबर, विकास शिंदे, सोपान सावंत, शुभम कांबळे, सागर भिंताडे, मुकादम विजय आसबे, संजय पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ऊस वाहतूकदारांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहनांवर आवश्यक सुरक्षा साधने बसवावीत आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here