सातारा : सह्याद्री कारखान्याकडून पाटबंधारे विभागाकडे १८ लाख रुपये पाणीपट्टी जमा

सातारा : कृष्णा व कोयना नद्यांवरील उपसा जलसिंचन योजनांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे दरवाजे वेळेत बसविणे आवश्यक आहे. फेब्रुवारीत कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटल्याने सह्याद्री कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल पाटील यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर नदीत पाणी सोडण्यात आले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक शिंदे यांच्या हस्ते कारखाना पुरस्कृत सहकारी पाणीपुरवठा संस्थांकडील पाणीपट्टीची १८ लाखांची रक्कम पाटबंधारे खात्याकडे सुपूर्द केली. यावेळी ते बोलत होते.

याबाबत कार्यकारी संचालक शिंदे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक स्व. पी. डी. पाटील यांनी जिराईत शेती बागायती व्हावी, उसाला पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सहकारी पाणी संस्थांची उभारणी केली. माजी मंत्री, अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना सक्षमपणे कार्यरत आहेत. मध्यंतरी पाणी वेळेवर न सोडल्यामुळे कोर्टी येथील कोटेश्वर सहकारी पाणीपुरवठा योजना सुमारे आठ दिवस बंद होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. धनादेश सुपूर्द प्रसंगी कृष्णा सिंचनच्या कार्यकारी अभियंता प्रगती यादव, कोयना सिंचनचे कार्यकारी अभियंता राशनकर, उपकार्यकारी अभियंता व्ही. एम. बनसोडे, एन. जी. सय्यद, एस. एम. क्षीरसागर, आर. जी. तांबे, पी. एस. चव्हाण, अक्षय पाटील, राजन डवरी, उदय नांगरे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here