सातारा : कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी सहकार आणि संस्थापक पॅनेलचे जोरदार शक्तिप्रदर्शन

सातारा : रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी ८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजअखेर दाखल उमेदवारी अर्जाची एकूण संख्या ८८ झाली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत २१५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज, शुक्रवारचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्रे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखाना निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, गेल्या निवडणुकीत सभासदांनी आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले होते. यंदाही त्यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नाही. गेल्यावेळेपेक्षा मताधिक्य वाढलेले पाहायला मिळेल.

सहकार पॅनलकडून डॉ. सुरेश भोसले यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी गुरूवारी जोरदार शक्तीप्रदर्शनाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. संस्थापक पॅनलकडून अविनाश मोहिते यांच्या उमेदवारांनीही तितक्याच ताकदीने आपली उमेदवारी अर्ज दाखल केले. गटनिहाय दाखल अर्जांमध्ये वडगाव हवेली दुशेरे गटात १३, काले कार्वे गटात ८, नेलें तांबवे गटात १३, रेठरे हरणाक्ष बोरगाव गटात १४, येडे मच्छिंद्र गटात १० आणि रेठरे बुद्रुक गटात ६ अर्ज दाखल झाले. निवडणुकीविषयी संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते म्हणाले की, कारखान्यात गेल्या अकरा वर्षात सत्ताधाऱ्यांनी जो गलथान कारभार केला आहे, त्याविरोधात आमची लढाई आहे. कृष्णा कारखाना निवडणुकीत संस्थापक पॅनेल पूर्ण ताकतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सभासदांचे कारखान्यातील हक्क अबाधित ठेवण्यासाठी संस्थापक पॅनल ही निवडणूक लढत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here