सातारा : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी साखर संचालकांनी मागवले ठराव; मे महिन्यात निवडणूक शक्य

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत जुलै २०२६ ला संपत आहे. तत्पूर्वी कारखान्याची निवडणूक होऊ शकते. त्यानुसार मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. या प्रक्रियेत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम सध्या सुरू असून साखर संचालकांनी कारखान्यासंबंधित सहकारी संस्थांचे ठराव १२ एप्रिल २०२६ अखेर मागवले आहेत. सध्या निवडणूकपूर्व मतदार यादी संकलन व अद्यायवतीकरणाचे काम स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

कारखान्याचे सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र विखुरले असून यात कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस, खानापूर या सहा तालुक्यांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण ४८ ते ५० हजार ऊस उत्पादक सभासद असून यातून २१ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. सध्या साखर संचालकांकडून निवडणुकीत सहभागी सहकारी संस्थांचे ठराव मागविण्यात आले. बहुतांश सभासद सहकारी संस्थांनी मागणीनुसार सहकार साखर संचालकांना ठराव पाठवले आहेत. काही संस्थांचे ठराव तयार करण्याचे कामकाज सुरू आहे. ठराव पाठवण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल आहे. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून अर्चना अविनाश मोहिते निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यामुळे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले याही कदाचित या निवडणूक निमित्ताने पुढे येऊ शकतात.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here