उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत १०३.०३ लाख टन साखर उत्पादन

उत्तर प्रदेशमधील गळीत हंगाम २०२२-२३ आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि साखर उत्पादन १०५ लाख टन होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ८ मे २०२३ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी १०७१.४८ लाख टन ऊस गाळप करून १०३.०३ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात राज्यात १०१६.२६ लाख टन ऊस गाळप करुन १०१.९८ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते.

ऊस बिलांबाबत सरकारच्या प्रयत्नांमुळे साखर कारखाने वेळेवर पैसे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत २७,०११.४३ कोटी रुपये म्हणजे ७५.११ टक्के पैसे अदा करण्यात आले आहेत.

सध्याच्या सरकारकडून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ३५,१११.०६ कोटी, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ३३,००७.९५ कोटी, गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ३५,८९८.८५ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ३३,०४८.०६ कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये ३५,४४४.०६ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. याशिवाय गेल्या हंगामातील १०,६६६.६९ कोटी रुपयांसह आतापर्यंत एकूण २,१०,१९३.१० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here