सोलापूर : जकराया शुगरतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात २०७ जणांचे रक्तदान

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य तथा जकराया शुगरचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली जकराया शुगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात २०७ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश माने होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. यावेळी जकराया शुगरच्या कार्यस्थळावर वृक्षारोपणाचाही कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांनी विविध वृक्षांची लागवड केली. सामाजिक सेवा आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांचा संगम या उपक्रमातून साधण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे, सुदर्शन यादव, नागेश डोंगरे, अजित लेंडवे, महेश जाधव, माजी सरपंच रफिक पाटील, चंद्रकांत सरवळे, पांडुरंग सरवळे, अजित काकडे, अमरनाथ सरवळे, बाळासाहेबनाईकनवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here