सोलापूर : ‘गोकुळ’च्या थकीत बिलाबाबत शेतकरी आक्रमक, पैसे न मिळाल्यास सोमवारपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा

सोलापूर : गोकुळ शुगरकडील थकीत उसाची बिले पंधरा दिवसात दिली जातील या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शब्दावरच उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलन स्थगित केले होते. गुरुवारी या आश्वासनाला पंधरा दिवस पूर्ण होत आहेत. अद्याप पैसे न मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. आमदारांनी दिलेल्या आश्वासनावर आम्ही आंदोलन स्थगित केले. आज शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत.

पेरणी तोंडावर आहे, लोकांची देणे वाढली आहेत, त्यांना केलेले वायदे चुकत आहेत. यामुळे आता कारखान्याकडील पैशांशिवाय पर्याय नाही. बिल न मिळाल्यास सोमवारपासून परत उग्र आंदोलनास सुरुवात होईल, असे आंदोलकांचे नेते अॅड. अमोल पाटील यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याकडील असणाऱ्या कर्जाच्या रकमा व इतर देणे याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे हा व्यवहार थांबला असल्याचे सांगितले जात आहे. गोकुळ शुगर्सकडील थकीत बिलासाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी महिन्याच्या सुरुवातीला १७ दिवस आंदोलन केले होते. कारखान्याकडे ऊस उत्पादकांची चालू वर्षातील आणि गेल्या वर्षीतील असे ६० कोटी रुपये थकीत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here