सांगली : थकीत बिले द्या, मगच कारखाना सुरू करा, ‘स्वाभिमानी’चे एन.डी.पाटील शुगर्सला निवेदन

सांगली : २०२५-२६ हंगामातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले अदा केल्याशिवाय आणि २०२६-२७हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन एन. डी. पाटील शुगर्सच्या प्रशासनाला देण्यात आले.थकीत ऊस बिले तातडीने अदा करावीत. तसेच जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत निश्चित होणारा २०२६-२७ हंगामाचा ऊस दर जाहीर केल्यानंतरच गाळप सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व उपाध्यक्ष केदार पाटील यांनी, शेतकऱ्यांची मागील थकीत देणी तत्काळ अदा केली जातील, असे सांगितले. तसेच जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतहोणाऱ्या निर्णयाचा विचार करून २०२६-२७ च्या ऊस दराची घोषणा केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते भागवत जाधव, संदीप राजोबा, विश्वास कोळी, संजय बेले, प्रकाश देसाई, शिवाजी पाटील, जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, प्रताप पाटील, मनोहर पाटील, उत्तम पाटील, देवानंद पाटील, संजय खोलकुंबे, सुरेश वसगडे, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here