सोलापूर : जकराया कारखान्याच्या सीबीजी प्रकल्पाची माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्याकडून पाहणी

सोलापूर: जकराया शुगरला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भेट देली. जकराया शुगरचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या येणकी मल्टिपल न्यूट्रियन्स या फार्म कंपनीचीही पाहणी केली. यावेळी जकराया शुगरचे तज्ज्ञ संचालक राहुल जाधव उपस्थित होते. त्यांनी सीबीजी प्रकल्पाची कार्यपद्धती, उत्पादन क्षमता आणि भविष्यातील विस्तार योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. हा प्रकल्प देशातील इतर साखर कारखानदारीसमोर एक पथदर्शी मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचे मत नाईक- निबांळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सचिन जाधव म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसायाची संधी मिळावी, या उद्देशाने येणकी मल्टिपल न्यूट्रियन्सची स्थापना करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हे आमचे ध्येय आहे. जकराया शुगरचा सीबीजी प्रकल्प आणि आमचा उपक्रम हे दोन्ही ग्रामीण विकासाचे उत्तम उदाहरण आहेत. अधिकाऱ्यांनी औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील नव्या उपक्रमांची पाहणी केली. कारखान्याने उभारण्यात आलेल्या सीबीजी प्रकल्पाची त्यांनी सखोल माहिती दिली. यावेळी पंचायत समितीचे गटनेते संजीव खिलारे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here