सोलापूर : जिल्ह्यात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव; नियंत्रणासाठी अडीच हजार प्रकाश सापळे कार्यान्वित

सोलापूर : चालू वर्षात एल-निनोचा महाराष्ट्रातील शेतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे संकट तोंडावर कायम असताना उसासह अन्य पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, कृषी विभागाने हुमणीसाठी २ हजार ४४९ प्रकाश सापळे कार्यन्वित केली आहे. यंदा अल निनोमुळे पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात खंड पडणे तसेच एकूण पर्जन्यमान कमी राहणे अशा परिस्थितीची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यात हुमणी कीड नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, हुमणी ही कीड उसासह विविध पिकांच्या मुळांवर उपजीविका करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.

मान्सूनपूर्व पावसानंतर हुमणी किडीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या मुंग्यांचा प्रारंभीच्या अवस्थेत नाश करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे कृषी विभागामार्फत जिल्हाभर जनजागृती करून शेतकऱ्यांना प्रकाश सापळे उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एका दिवसात तब्बल २,४४९ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष प्रकाश सापळे कार्यान्वित करून हुमणी कीड नियंत्रण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here