सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून हंगामातील संपूर्ण ऊस तोडणी, वाहतूक बिले अदा

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब कारखान्याचे सन २०२४-२५ हंगाम अखेरपर्यंतची संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना अदा करण्यात आली आहेत. या ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण १२७ कोटी ६८ लाख इतकी रक्कम अदा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन २०२४-२५ गळीत हंगामात युनिट नं. १ कडे ११ लाख २३ हजार ९९९ मे.टन व युनिट नं. २ कडे ३ लाख ७५ हजार ७३८ मे. टन असे एकूण १४ लाख ९९ हजार ७३७मे. टन उसाचे गाळप झाले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे ऊस तोडणी वाहतुकीचे काम केलेल्या ऊस तोडणी वाहतूकदारांना १५ जानेवारीअखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आलेली आहेत. ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी ४८ कोटी ८६ लाख अदा करण्यात आले आहेत. कारखान्याने आजअखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी एकूण १२७ कोटी ६८ लाख अदा केलेले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

तसेच कारखान्याने या हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या उसाच्या बिलासाठी प्रति टन २८०० प्रमाणे हंगामअखेर ४१९ कोटी ९२ लाख इतकी रक्कम अदा केलेली आहे. हंगामअखेर संपूर्ण ऊस बिलाचे व ऊस तोडणी वाहतूकीचे पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव आहे. यापुढील हंगाम यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे देवून सहकार्य करावे, असे आवाहन माजी आ. बबनराव शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे वामनराव उबाळे, संतोष दिग्रजे व सर्व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here