पुढच्या महिन्यापासून ब्रिटनसाठी उडणार स्पाईसजेट

125

मुंबई: बजट विमान कंपनी स्पाईसजेट ला लंडन च्या हीथ्रो हवाई अड्डयावर स्लॉट मिळाला आहे. यामुळे एअरलाइन पुढच्या महिन्यापासून लंडनसाठी उड्डाण सुरु करु शकेल.

स्पाइसजेट ने शेअर बाजाराला पाठवलेल्या सूचनेत सांगितले आहे की, एअर बबल कराराअंतर्गत हे स्लॉट मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु झाल्यानंतर याचा विस्तार करुन त्याला नियमित उड्डाणाची अनुमति दिली जाईल.

एअर बबल एक द्विपक्षीय व्यवस्था आहे, ज्यामध्ये दोन देशांच्या एअरलाइन्स काही नियम आणि अंकुशांसह आंतरारष्ट्रीय उड्डाणाचे परिचालन करु शकतात.
स्पाइसजेट ने सांगितले की, त्यांना एक सप्टेंबर पासून उड्डाणाच्या परिचालनासाठी हीथ्रो हवाई अड्डयावर स्लॉट मिळाला आहे. हा भारत आणि ब्रिटन च्या दरम्यान झालेल्या बबल कराराअंतर्गत आहे,आणि 23 ऑक्टोबर पर्यंत याची अमलबजावणी होईल .

एअरलाइन ने सांगितले की नियमित परिचालन सुरु झाल्यानंतर याचा विस्तार केला जाईल. कोविड 19 महामारी मुळे भारतात 22 मार्च पासून सर्व आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक उड्डाणे बंद केली आहेत. दरम्यान, दुसर्‍या देशांमध्ये अडकलेल्या आपल्या नागरीकांना परत आणण्यासाठी तथा चार्टर उड्डाणांचे परिचालन केले जात आहे.

स्पाइसजेट यांनी सांगितले की, हिवाळ्यात नियमित परिचालनासाठी स्लॉट घेण्यासाठी त्यांची चर्चा सुरु आहे. भारतामध्ये एअरलाइन्स हिवाळ्याच्या अर्थात ऑक्टोबर च्या शेवटच्या शनिवारी सुरु होवून मार्चच्या शेवटी संपते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here