पाकिस्तानमध्ये साखरेचा काळाबाजार करणारे ताब्यात, 480 साखरेची पोती जप्त

122

पाकिस्तानच्या खानेवाल जिल्हा प्रशासनाने सोमवारी साखरेच्या गोदामावर छापा टाकून 480 साखरेची अवैध पोती जप्त केली. साखरेचा काळाबाजार करणार्‍या रमजान आणि हनीफ यांनी बेकायदशीररीत्या साखरेची पोती भरली होती. सहायक आयुक्त जीशान यांनी गोदामांना टाळे लावले. सहायक आयुक्त म्हणाले, कुणालाही कमोडिटी जमा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले, ही गोष्ट न मानणार्‍या अवैध कारभाराविरोधात कडक कारवाई केली जाईल.
पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांपासून साखर घोटाळ्याला घेवून मोठा गोंधळ सुरु आहे. आता कोरोना वायरसमुळे साखरेची तंगी भासू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here