साखर उद्योगाची सरकारकडे मदतीची मागणी; ‘एमएसपी’त वाढ आणि प्रति क्विंटल 500 रुपये अनुदानाची मागणी

मुंबई: साखर उद्योगाने वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) वाढ आणि प्रति क्विंटल ₹500 अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विधान भवनात साखर उद्योगाशी संबंधित घटकांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की, साखर उद्योगाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतील.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले कि, साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रमुख मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.मुख्य मागण्यांमध्ये साखरेचा MSP ₹31 प्रति किलोवरून ₹41 प्रति किलोपर्यंत वाढविणे, कारखान्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉल उत्पादनाची मर्यादा 30% वरून 50% पर्यंत वाढविणे आणि साखर उत्पादनावर प्रति क्विंटल ₹500 अनुदान देणे यांचा समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

वरिष्ठ एनसीपी नेते दिलीप वळसे-पाटील यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, प्रतिकूल हवामानामुळे यंदा राज्यातील ऊस उत्पादन सुमारे 15% नी घटले आहे, त्यामुळे गाळप हंगाम नेहमीच्या 160 दिवसांच्या तुलनेत 100 दिवसांपेक्षा कमी राहिला. ते म्हणाले की, कारखाने लवकर बंद झाल्यामुळे साखर उद्योगाला सुमारे ₹3,300 कोटींचा तोटा झाला आहे, तर शेतकऱ्यांना देय असलेले ₹4,315 कोटींचे एफआरपी अद्याप थकित आहेत.

आगामी खरीप हंगामात संभाव्य दुष्काळाबाबतही चिंता वाढत आहे, ज्याचा परिणाम ऊस शेतीवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, एल निनोमुळे दुष्काळ पडल्यास जास्त पाण्याची गरज असलेल्या ऊस शेतीवर सरकार मर्यादा घालू शकते. त्याऐवजी कृषी संस्था पीक विविधीकरणाला चालना देत शेतकऱ्यांना कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे—जसे की भरड धान्ये (मिलेट्स) आणि कडधान्ये—वळण्यास प्रोत्साहन देऊ शकतात.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here