ऊस थकबाकी लवकर भागवावी

99

शाहबाद : भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष आदेश शंखधार यांनी सांगितले की, साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देय आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.ऊसाची थकबाकी लवकर भागवली जावी. ते परोता गावामध्ये आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.

त्यांनी सांगितले की, लॉकडाउन मध्ये शेतकर्‍यांची कंबर मोडली आहे. ढकिया बिजलीघर क्षेत्रामध्ये शेतकर्र्‍यांना नियमितपणे विज मिळत नाही. यामुळे शेतकर्‍यांच्यात आक्रोश आहे. याशिवाय शेतकर्‍यांना चेंकिंगच्या नावावर त्रास दिला जात आहे. दरम्यान त्यांनी सर्व शेतकर्‍यांना एकत्र येण्याची विनंती केली. संघटनेच्या मजबूती तसेच विस्तारासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जिल्हा प्रचार प्रमुख मुजीब कमल यांनी संघटनेचा विस्तार करताना क्षेत्रातील डझनभर शेतकर्‍यांना संघटनेचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी जीवन पुस्तिका भेट देवून संघटनेत सामिल करुन घेतले. यावेळी दुष्यंत गुप्ता, श्याम सिंह, रामकुमार सिंह, प्रल्हाद सिंह, रामधुन, बुद्धी सिंह, रघुनाथ, नवल सिंह तसेच गुड्डू आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here