बीड : उसाला प्रतिटन 5,200 रुपये दर देण्याची भारतीय किसान संघाची मागणी

बीड : उसाच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार २०० रुपये दर द्यावा. ही प्रमुख मागणी भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या व्यापक बैठकीत करण्यात आली. प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके गुरुजी प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला खरीप हंगाम, पर्जन्यमान, एकूण शेती स्थितीचा आढावा घेण्यात आला. अनेक भागांत असमान पावसामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती दुष्काळात बदलण्यापूर्वी शासनाने तातडीने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी राज्यातील २५ जिल्ह्यांतील २७८ तालुक्यांत ३ लाख सभासद नोंदणीचा संकल्प करण्यात आला. ३ हजार ग्राम समित्या स्थापन करण्याचा निर्णय झाला. बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष के. साई रेड्डी, राष्ट्रीय मंत्री बाबूभाई पटेल, क्षेत्रीय संघटन मंत्री पद्मश्री डॉ. दादा लाड, प्रांत महामंत्री मदन देशपांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मंजूर झालेले ठराव बैठकीत पेट्रोल मध्ये २५ टक्के इथेनॉल मिश्रण, डिझेलमध्ये ५ टक्के आयसोब्युटेनॉल मिश्रण, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर अधिकार शेतकऱ्यांना मिळावेत, असा ठराव मंजूर झाला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here