कोल्हापूर जिल्ह्यातील गुडाळ येथे ऊसाला आग; शेकडो एकर ऊस जळून खाक

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील गुडाळ (जि.कोल्हापूर) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेकडो एकर ऊस जळून खाक झाला.या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच भोगावती साखर कारखाना आणि दुधगंगा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.

कडक उन्हाळा आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरत होती. अशा कठीण परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आगीवर मात करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक अंदाजानुसार शेतातील विद्युत वाहिनीचे शॅार्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here