साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्राने ३५० व राज्य शासनाने ३५० रूपये प्रतिटन अनुदान द्यावे : बिपीन कोल्हे

अहिल्यानगर : शासनाच्या धोरणाप्रमाणे यंदा साखर हंगाम एक महिना अगोदर सुरू होत आहे. ‘संजीवनी’ने त्याची तयारी केली आहे. यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, त्यामुळे उसाचा उतारा आणि उत्पादन घटणार आहे. त्यामुळे साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्राने ३५० व राज्य शासनाने ३५० रूपये, असे ७०० रूपये प्रतिटन अनुदान सर्व साखर कारखान्यांना द्यावे, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदन समारंभ बिपीन कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे, संचालक ज्ञानदेवराव औताडे त्यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई औताडे यांच्या हस्ते शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कारखाना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक, सीओओ शिवाकुमार मोहनदास, तांत्रिक सल्लागार सिमांचल पांडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी प्रास्ताविक केले.

ChiniMandi WhatsApp Channel

खरीपात तीन महिने पावसाने ओढ दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना थोडेफार पाणी आहे, त्यांनी चारा कडवळ पीक घ्यावे. त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे पुरविणार आहे. पुढच्या हंगामाचे नियोजन केले नाही तर राज्यातील ५० टक्के साखर कारखाने बंद पडतील, अशी भीतीही बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणुकीतून सहकारमहर्षी साखर कारखाना प्रत्येक हंगामात निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर मात करून यशस्वी मार्गा क्रमण करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, संजय होन, त्रंबकराव परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, निवृत्ती कोळपे, कामगार नेते मनोहर शिंदे, शरद थोरात, राजेंद्र देशमुख, कैलास माळी, अंबादास देवकर, बाळासाहेब शेटे, प्रदिप नवले, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव कदम, दगुराव चौधरी, मच्छिंद्र लोणारी, साहेबराव रोहोम, केशव भवर, अशोकराव औताडे, नारायणराव कार्ले उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here