देशात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला, साखर उत्पादनाने 271 लाख मेट्रिक टनाचा टप्पा ओलांडला : NFCSF

नवी दिल्ली : नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने 31 मार्च 2026 पर्यंत देशातील गाळप हंगामाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये गाळप हंगाम संपण्याच्या टप्प्यावर आहे.चालू हंगामात आतापर्यंत 271.20 लाख मेट्रिक टन (LMT) साखरेचे उत्पादन झाले असून, मागील हंगामातील याच कालावधीत हे उत्पादन 248.65 LMT होते. 2025-26 साखर वर्षात एकूण 540 साखर कारखाने कार्यरत होते, तर 2024-25 मध्ये ही संख्या 533 होती. सध्या केवळ 74 कारखाने सुरू आहेत, जे मागील वर्षी याच काळात 113 कारखाने सुरु होते.

महाराष्ट्रात साखर उत्पादन 98.95 LMT झाले आहे, जे 2024-25 हंगामात याच कालावधीत 80.10 LMT होते. राज्यात सरासरी रिकव्हरी 9.50 टक्के इतकी नोंदवली गेली आहे, जी मागील हंगामातही तितकीच होती. उत्तर प्रदेशात साखर उत्पादन 87.45 LMT पर्यंत पोहोचले असून, मागील हंगामात ते याच कालावधीत 87.70 LMT होते. राज्यातील सरासरी रिकव्हरी 10.20 टक्के झाली आहे. कर्नाटकात साखर उत्पादन 46.75 LMT झाले असून, 2024-25 मध्ये ते 39.90 LMT होते. सरासरी रिकव्हरी 8.65 % नोंदवली गेली, जी गेल्या वर्षीच्या 8.50 % पेक्षा जास्त आहे. ‘एनएफसीएसएफ’च्या अहवालानुसार, गुजरातमध्ये 1, आंध्र प्रदेशात 2, हरियाणात 4, पंजाबमध्ये 2 आणि तामिळनाडूमध्ये 18 कारखान्यांचा हंगाम अजूनही सुरू आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here