केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून सप्टेंबर २०२५ साठी २३.५ लाख टन साखरेचा कोटा जारी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २८ ऑगस्ट रोजी सप्टेंबर २०२५ साठी २३.५ लाख मेट्रिक टन (एलएमटी)चा मासिक साखर कोटा जाहीर केला आहे. हा साखर कोटा सप्टेंबर २०२४ साठी देण्यात आलेल्या कोट्याइतकाच आहे. सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये, देशांतर्गत विक्रीसाठी २३.५ लाख मेट्रिक टन साखरेचा मासिक कोटा दिला होता. ऑगस्ट २०२५ साठी वाटप केलेला साखरेचा कोटा २२.५ लाख मेट्रिक टन होता.

ChiniMandi WhatsApp Channel

ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या २०२३-२४ हंगामासाठी एकूण साखरेचा कोटा २९१.५० एलएमटी होता. तर ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या २०२४-२५ हंगामासाठी साखरेचा कोटा २७५.५० एलएमटी आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत दुर्गापूजेसारखे सण असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढेल. देशांतर्गत किमती प्रति क्विंटल ५० ते ७० रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये साखरेचा वापर २५.१० लाख मेट्रिक टन होता.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here