‘कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे

सातारा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या १६ महिला सभासद शेतकरी रवाना झाल्या आहेत. त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते.

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील १६ महिला सभासद शेतकर्यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शिबीरासाठी रवाना होणाऱ्या महिला शेतकऱ्यांना व्हाईस चेअरमन जे.डी. मोरे, संचालक बाजीराव निकम, बाळासाहेब जगताप, अरविंद पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी शुभेच्छा दिल्या.शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, दादासाहेब शेळके, डिस्टीलरी विकास आभाळे, प्रोडक्शन मॅनेजर विकास फडतरे, परचेस मॅनेजर विक्रमसिंह माने, सिनिअर सिव्हिल इंजिनिअर जयवंत शिंदे, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊस विकास अधिकारी शिवाजी बाबर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here