विश्वचषक 2023: भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी होणार….

मुंबई : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आज (२७ जून) संपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज टूर्नामेंट सुरू होण्याच्या 100 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केले. BCCI ने मुंबईत सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटच्या कुंभमेळ्याची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबर रोजी उद्घाटन सामन्याने होईल, ज्यामध्ये गतविजेता इंग्लंड उपविजेत्या न्यूझीलंडशी भिडणार आहे. अहमदाबादमध्येच 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

विश्वचषकादरम्यान, 45 सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड-रॉबिन लीगमध्ये 10 संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य अंतिम सामना मुंबईत होणार आहे. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. वानखेडे स्टेडियमवर  2011 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 28 वर्षांनंतर श्रीलंकेचा पराभव करत एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद जिंकले होते.

पाकिस्तान बोर्डाची अहमदाबादमध्ये खेळण्यास सहमती…

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईमध्ये खेळायचा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तिन्ही सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये व्हावा असे पीसीबीला वाटत नव्हते. तसेच पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवल्याचे समजते.

भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक असे आहे…

 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)

15 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)

19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश (पुणे)

22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाला)

29 ऑक्टोबर वि. इंग्लंड (लखनौ)

2 नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ (मुंबई)

5 नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

11 नोव्हेंबर विरुद्ध पात्रता 1 (बेंगळुरू)

बाद फेरीचे सामने…

पहिला उपांत्य फेरीचा सामना बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे खेळवला जाईल. दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस असेल. 20 नोव्हेंबर रोजी राखीव ठेवण्यात आले आहे. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील. ते स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सुरू होतील.

सराव सामने आणि स्पर्धांचे ठिकाण…

विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी एकूण 10 ठिकाणे असतील. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता. हैदराबादशिवाय गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here