तीन राज्यांतील १७ साखर कारखाने पुनर्जीवित; ११ लाख शेतकऱ्यांना आर्थिक न्याय : ओंकार शुगर ग्रुप संचालक ओमराजे बोत्रे-पाटील

पुणे : बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगात मोठी कामगिरी केली असून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील बंद पडलेले १७ साखर कारखाने पुनर्जीवित केले. या माध्यमातून सुमारे ११ लाख ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊसतोडणी मजुरांना आर्थिक न्याय दिला असल्याची माहिती ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

ओमराजे बोत्रे-पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या १७ कारखान्यांच्या माध्यमातून ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले. यासाठी शेतकऱ्यांना १ हजार ८३० कोटी रुपयांची ऊस बिले, तर ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांना ७१० कोटींची बिले अदा करण्यात आली आहेत. १८ हजार साखर कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून दिला असून, या हंगामात ६ हजार कोटींची उलाढाल झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आकार देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

येत्या आगामी हंगामात २१ साखर कारखाने चालविण्याचे ओंकार ग्रुपचे नियोजन असून, १ कोटी मेट्रिक टन गाळपाद्वारे ७हजार कोटींची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलमध्ये ३३ टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी मिळणार असल्याने, ग्रुपने सर्व मॉलेसेस साठवून ठेवले आहे. यातून सुमारे ६०० कोटी रुपये मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ओंकार ग्रुपकडे २ ते ३ हजार कोटींची ऊस बिले थकल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले, केवळ एका महिन्याचे ऊस पेमेंट शिल्लक असून, ते लवकरच अदा केले जाईल. कुणाचाही एक रुपयाही ठेवला जाणार नाही. राज्यातील १४० कारखान्यांकडे एफआरपीपोटी २१०० कोटी थकलेले असताना, जाणीवपूर्वक ओंकार ग्रुपबद्दल पसरविणाऱ्यांवर अफवा शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देऊन सर्वांची प्रगती करणे हेच बाबुराव बोत्रेपाटील यांचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here