‘युटोपियन शुगर्स’कडून २७११ रूपये पहिला हप्ता : चेअरमन उमेश परिचारक

सोलापूर : कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन २७११ रूपयाप्रमाणे दर देणार असल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. युटोपियन शुगर्स या कारखान्याने यापूर्वीच हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास प्रती मे.टन २५११ रूपयाप्रमाणे पहिली उचल जाहीर केलेली होती. त्यामध्ये आता २०० रूपयाची वाढ करून २७११ रूपयाप्रमाणे सुधारीत दर देण्यात येणार आहे.

लवकरच पहिल्या पंधरवडयाच्या बिलाची रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे परिचारक यांनी सांगितले. तरी सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी या सुधारीत दर बदलाची नोंद घेऊन गाळप हंगाम २०२३-२०२४ करीता जास्तीत जास्त ऊस युटोपियन शुगर्स कडे गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन परिचारक यांनी केले आहे. याप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here