‘जवाहर’चे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना एस. सी. शर्मा गोल्ड मेडल पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना ‘दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया’ या तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या देश पातळीवरील तंत्रज्ञानांच्या संस्थेकडून साखरेच्या प्रक्रियेमध्ये संशोधनात्मक उपक्रम राबविल्याबद्दल ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ हा पुरस्कार जाहीर झाला. जोशी यांनी साखर कारखान्याच्या तंत्रज्ञानामध्ये नवनवीन उपक्रम राबविले आहेत. जयपूर येथे ३० जुलै रोजी संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर जोशी यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here