कोल्हापूर : शरद जोशी विचार मंचचे पाच हजार रुपये ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : गळीत हंगामात साखर सरासरी ४० ते ५० रुपये दराने विकली गेली. इतर उपपदार्थांनाही चांगला दर मिळाला आहे. गेल्या हंगामातील साखरेचा हिशोबही अजून कारखान्यांनी दिलेला नाही, जोपर्यंत प्रतिटन ५ हजार रुपये दर दिला जात नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शरद जोशी विचार मंच यांनी घेतली आहे. विचार मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शरद जोशी विचार मंचचे शिवाजी माने, भगवान काटे, प्रा. डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, बाळकृष्ण पाटील, सदाशिव कुलकर्णी, रूपेश पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते, बियाणे, मजुरी, पाणीपट्टी, वीज बिल यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाच वर्षांत उसाचा उत्पादन खर्च ७० टक्क्यांनी वाढला आहे. उसाचा उत्पादन खर्च ७० टक्क्यांनी वाढला असताना एफआरपी मात्र २२ टक्क्यांनीच वाढली आहे. साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळूनही कारखाने एफआरपी वाढवत नाहीत. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उसाचा दर केवळ ५ टक्के वाढला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पाच हजार रुपये प्रतिटन दर द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here