उत्तर प्रदेश : बिजनौरमध्ये रोगग्रस्त ०२३८ प्रजातीच्या ऊस लागवडीत मोठी घट

बिजनौर : उसाची ०२३८ ही जात रोगांच्या चक्रव्यूहात अडकून पडल्यानंतर कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांनी इतर उसाच्या जातींची लागवड सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारी ०२३८ ही उसाची जात जिल्ह्यात ९७ टक्क्यांवरून ४१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. खरेतर २००९ मध्ये उत्तर प्रदेशात ०२३८ ही जात प्रसिद्ध झाली. प्रख्यात संशोधक बक्षी राम हे ०२३८ या ऊस जातीचे जनक आहेत. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात याचीच लागवड केली. उसाची वाढ चांगली होणे, वजन आणि चांगला साखर उतारा यामुळे या प्रजातीने शेतकऱ्यांना आकर्षित केले होते.

शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळवल्याने बिजनौर जिल्ह्यात जवळपास ९७ टक्केपर्यंत ०२३८ प्रजातीच्या उसाची लागवड केली जात होती. तर उर्वरित ३ टक्के उसाच्या इतर जाती होत्या. थोड्या कष्टाने शेतकऱ्यांना ९० ते १०० क्विंटल प्रती बिघा उत्पादन सहज मिळत होते. परंतु नंतर ०२३८ लाल सड रोग व इतर रोगांच्या तडाख्यात सापडले. आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांचा या जातीबद्दल भ्रमनिरास होऊ लागला. ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागरूक केले आणि मोठ्या प्रमाणात ०२३८ एकर क्षेत्र बदलले. आज जिल्ह्यात शेतकरी इतर प्रजातीच्या उसावर भर देत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी प्रभु नारायण सिंह यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ०२३८ अंतर्गत क्षेत्र आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here