पुणे : माळेगाव कारखान्याचे गेटकेनमुक्त ऊस धोरण, सोळा जणांची समिती स्थापन

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर मागील दीड महिन्यांपासून त्यांच्या अधिपत्याखाली कारखान्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी उसाबाबत गेटकेन मुक्ती करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे ठरले. संचालक नितीन सातव यांच्या सोळा जणांच्या समितीने कार्यक्षेत्रात १० टनापर्यंत उसाचे उत्पादन वाढविण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय झाला. कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी दिली.

याबाबत उपाध्यक्षा कोकरे म्हणाल्या की, कारखाना प्रशासनाने ऊस गळीत हंगामामध्ये अधिकाधिक गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी संचालक नितीन सातव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये योगेश जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, स्वप्नील जगताप, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, अशोक पाटील, सुरेश काळे, संदीप जगदाळे, सोहेल देवकाते, प्रणीत निंबाळकर, सौरभ कोकरे, प्रज्वल धुमाळ, ऊस विकास विभाग, ऋतिक आटोळे आदींचा समावेश आहे. सभासदांच्या शिवारात एकरी १० टन ऊस उत्पन्नवाढीचे काम सुरू करण्यात आले आहे. समितीने तीन हजार एकर उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. कारखाना कार्यस्थळावर ऊस बेणे मळा निर्माण करणे, क्षारपड जमिनीचे प्रमाण कमी करण्यासाठी दत्त शिरोळ कारखान्याचा सब सरफेड ड्रेनेज पॅटर्न अभ्यासणे, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रासह गन्ना मास्टर ऊस रोपवाटिका – कांरदवाडी येथे भेट आदी कामे हाती घेतली आहेत

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here