कोल्हापूर : बिद्री कारखाना कार्यस्थळावर शेतकरी प्रशिक्षण, ऊस उत्पादनात वैज्ञानिक तंत्र वापराचे आवाहन

कोल्हापूर : बिद्री कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित एक दिवशी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी शेतकरी हा साखर उद्योगाचा कणा असून त्याच्या प्रगतीशिवाय कारखान्याची प्रगती शक्य नाही. त्यामुळे बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक व वैज्ञानिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी ऊस उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले. यावेळी द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सोहन शिरगावकर व डॉ. रमेश हासवे यांनीही मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे उपस्थित होते.

कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी एकरी १०० टनांहून अधिक उत्पादनासाठी योग्य वाण, वेळेवर लागवड, ठिबक सिंचन, तण कीड नियंत्रण आणि सेंद्रिय घटकांचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. डॉ. तुषार जाधव यांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने माती परीक्षण, पिकांची वाढ व रोगांचे अचूक निरीक्षण करता येते. यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढते असे स्पष्ट केले. डॉ. अरुण मराठे म्हणाले, मृदा आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत संतुलित खत व्यवस्थापन व सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता आवश्यक आहे. डॉ. बी. एम. जमदग्नी यांनी सुपर केन नर्सरी तंत्रामुळे कमी खर्चात सशक्त रोपे तयार होऊन उत्पादन क्षमतेत वाढ होत असल्याचे सांगितले. मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सेक्रटरी एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here