पाटणा : राज्यातील ऊस शेतीला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. ऊस उद्योग विभागाने ऊस शेतीचा विस्तार करण्यासाठी मोफत बियाणे पुरवठा योजनेला मुदतवाढ दिली आहे. आता शेतकरी २५ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रगत, गुणवत्तापूर्ण आणि रोगमुक्त बियाणे मोफत दिले जाईल. बियाणे शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी होणारा खर्चही सरकार करणार आहे. साखर कारखान्यांचे सभासद असलेले आणि नसलेले शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.
या योजनेसाठी केन केअर पोर्टवर ऊस क्षेत्र नसलेल्या गावांची नोंद घेतली जात आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही साखर कारखान्याकडून ऊस गाळपासाठी घेतला जात नाही, अशा ठिकाणचे सर्व शेतकरी या योजनेसआठी पात्र असतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यातील ऊस शेतीला चालना देण्यासाठी ही योजना असून शेतकऱ्यांना किमान ०.२५ एकर आणि जास्तीत जास्त २.५ एकर क्षेत्रासाठी हे मोफत बियाणे पुरविले जाणार आहे. बियाणे आणण्याचा खर्चही सरकार देणार आहे. शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.


















