ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती, कमी पावसातही एकरी उत्पादनात सरासरी ३० टनांची भर : प्रतापराव पवार

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस व्यवस्थापनाचा अवलंब करणाऱ्या राज्यातील पाच हजार शेतक-यांच्या नोंदींनुसार मागील हंगामात सरासरी एकरी उत्पादन ४९.८ टन होते. यंदा ते वाढून ८०.३३ टनांवर पोहोचले. म्हणजेच सरासरी ३०.५३ टनांची वाढ, तर सुमारे ६१.३ टक्के उत्पादनवाढ नोंदविण्यात आली. अभ्यासातील काही शेतकऱ्यांनी एकरी १०० ते १२५ टनांपर्यंत उत्पादन घेतल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे कमी पाऊस आणि हवामानातील अनिश्चितता असतानाही योग्य पाणी, खत आणि पीक व्यवस्थापनामुळे ही उत्पादनवाढ दिसून आली आहे, असे मत अॅग्रिकल्बरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी दैनिक ‘सकाळ’मध्ये लिहिलेल्या लेखात व्यक्त केले.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि ऊस पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या कालावधीत कमी पाऊस झाल्याने राज्यातील ऊस उत्पादक एकरी उत्पादनाबावत चिंतेत आहेत. त्यातच ‘एल निनों’ या संभाव्य प्रभाव, वाढते तापमान आगि जमिनीच्या तापमानात होणारी वाद यामुळे ऊस शेतीसमोरील आव्हाने अधिक वाढत आहेत, हवामानातील बदलांमुळे पिकाची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि पोषण व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना कमी पावसात अधिक उत्पादन घेण्याचे मोठे आव्हान आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

यंदाच्या हंगामात ऊस पिकावर पायरिला, पांढरी माशी, कोळी, मावा आणि कांडी कीड आदी प्रमुख किडीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे पीक संरक्षणावरील खर्च वावत आहे. किडींचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उसाची वाढ, वजन आणि गुणवत्ता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खतांची महागाई, पाण्याची कमतरता आणि मजुरीचे वाढते दर वामुळे प्रति एकर उत्पादन खच्चर्यातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी प्रभाषी ठरत आहे. यामध्ये उपग्रह आधारित सैटेलाइट मंपिंग, आयओटी (IoT) हवामान केंद्रे, जमिनीतील ओलावा मोजणारे सेन्सर्स, ड्रोनद्वारे पीक निरीक्षण व फवारणी, नियमित माती परीक्षण व प्रत्यक्ष शेतातील निरीक्षण (Ground Truthing) यांचा वापर केला जातो.

या सर्व माहितीचे ‘एआय हारे विश्लेषण करुन पाणी, खते आणि कीड-रोग व्यवस्थापनाबाबत शेतकन्यांना अचूक व वेळेवर सल्ला दिला जातो. त्यामुळे निविष्ठांचा कार्यक्षम वापर होतो. उत्पादन खर्चात बचत होते आणि एकरी उत्पादनवाढ साधण्यास मदत होते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साह्याने ऊस शेती अधिक अचूक, किफायतशीर आणि उत्पादनक्षम करण्याची नवी दिशा निर्माण होत आहे.

‘एआय’ मुळे ऊस उत्पाद‌नात वाढ

एआय’ आधारित ऊस व्यवस्थापनाचा अभ्यास केला असता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरी एकरी उत्पादनात तब्बल ३०.५३ टनांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर पाणी, खते आणि पीक संरक्षणावरील खर्चात बचत तसेच साखर उताऱ्यात सुधारणा झाल्याचे चित्र समोर आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here