नाशिक : ‘नासाका’ कामगारांचा ३ कोटी पीएफ खात्यात; मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांसह शेकडो कामगारांना दिलासा

नाशिक : मला एक महिन्याची मुदत द्या, कामगारांची प्रायव्हेट फंडाची रक्कम तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन पंधरा दिवसांपूर्वी क्षेत्रीय आयुक्त अनिल कोटकर यांनी दिल्यानंतर शब्दाला जागत कामगारांची पीएफ फंडाची तीन कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा केल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपासून सदर रकमेपासून कामगार वंचित होते.

वय वाढत असल्याने अनेक जण मृत्यूला सामोरे जात आहेत. मागील महिन्यात पाच कर्मचाऱ्यांचा वयोमानानुसार मृत्यू झाला. नासाका कामगारांची प्रायव्हेट फंडाची रक्कम मिळण्यासाठी कामगार नेते यांनी क्षेत्रीय आयुक्त अनिल कोटकर यांची भेट घेऊन त्या संदर्भात मागणी केली होती. यावेळी कोटकर यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिना द्या, असे सांगितले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळला. याबद्दल कोटकर यांच्यासह अधिकारी मोहित दीक्षित, सहायक आयुक्त राजेंद्र खैरनार, प्रवर्तन अधिकारी जयश्री जोईस, प्रवर्तन अधिकारी शुभम अग्रवाल यांचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

प्रायव्हेट फंडाच्या रकमेचा प्रश्न सुटला, मात्र सोसायटीच्या शिल्लक रकमेचाही प्रश्न लवकरच युनियन व सर्व कामगारांना सोबत घेऊन सोडविण्यात येईल, असे विष्णुपंत गायखे यांनी स्पष्ट केले. यावेळी युनियन अध्यक्ष शिवाजीराव गायधनी, सचिव अनिल गायधनी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गायधनी, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव बोराडे, सुधाकर गोडसे, सुधाकर दळवी, खंडेराव घे, पंडितराव सोनवणे, सुभाष उडुळे, जगन्नाथ कटाळे, बबनराव कागंने आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here