कोल्हापूर : बगॅस वाहतुकीचा ट्रक घरात घुसला, सुदैवाने जीवितहानी टळली

कोल्हापूर : औरवाड (ता. शिरोळ) येथे बुधवारी दुपारी बगॅस वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने थेट एका घरात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या अशोक गावडे यांच्या घरावर जाऊन आदळला. ट्रकच्या धडकेमुळे घराच्या भिंतीना मोठे तडे गेले असून अंगणात उभी असलेली दुचाकीचेही नुकसान झाले आहे. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, सैदापूर येथून मिरजकडे बॅगस घेऊन जाणारा ट्रक औरवाड गावातून जात होता. यावेळी चालक सचिन कांबळे याचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. ट्रक समोरील घरावर जाऊन आदळला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताच्या वेळी घरात लहान मुले टीव्ही पाहत बसली होती. मात्र ट्रक थेट घराच्या पुढील भागात घुसल्याने मुले थोडक्यात बचावली. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here