अहिल्यानगर : कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन उत्साहात

अहिल्यानगर: संभाव्य पाणी टंचाई ओळखून शिल्लक पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सुरु असलेल्या सिंचनाच्या आवर्तनाला स्थगिती दिली असून ऊस शेती धोक्यात आली आहे. जरी काहीशी चिंताजनक परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी जपून वापरावे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी अवाढव्य खर्च करू नये व पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. येथील कर्मवीर काळे कारखान्याच्या २०२६-२७ च्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ. अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन, आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांच्या हस्ते काल मंगळवारी (दि. १६) उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

मिल रोलर पूजनाने कारखान्याच्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झालेली आहे. येणाऱ्या गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन झाले असून संपूर्ण कारखान्याचे नूतनीकरणाचे काम मागील वर्षी पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे अडचणी बहुतांश प्रमाणात कमी झाल्या आहेत. तरी देखील दरवर्षी प्रमाणे कारखान्याच्या यंत्र सामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, प्रशांत घुले, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, दिनार कुदळे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here