कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्कार; नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव

कोल्हापूर : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या सहकार, साखर उद्योग आणि शेतकरी क्षेत्रातील दीर्घकाळाच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गुजरातचे जलसंसाधन व पुरवठामंत्री ईश्वरसिंग पटेल, हरियाणाचे सहकारमंत्री अरविंदकुमार शर्मा, पंजाबचे शेती व शेतकरी कल्याणमंत्री गुरमित सिंग खुदियान तसेच छत्तीसगडचे सहकारमंत्री केदार कश्यप, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जवाहरचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, संचालक आमदार राहुल आवाडे, उपाध्यक्ष बाबासो चौगुले आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here