सातारा जिल्ह्यातील काही भागात ऊस करपला, कृषी विभागाकडून गावोगावी पंचनामे सुरू

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागात जूनपासून पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके उगवूनही पाण्याअभावी करपली, तर काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. खरीप पिकांवर केलेला बियाणे, खते, मशागत आणि मजूरीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी आला असून, हातात उत्पादन नाही आणि खर्चाची परतफेड करण्याचे साधनही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने माण तालुक्याच्या पूर्व भागात यंदाचा खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला आहे. पावसाअभावी बाजरी, मका, तूर, ऊस यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आता कृषी विभागाकडून दुष्काळी पीक पाहणी व संयुक्त पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. पिकांची सद्यःस्थिती, बाधित क्षेत्र, नुकसानीचे स्वरूप तसेच संबंधित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या दैनंदिन खर्चापासून जनावरांच्या चारा-पाण्यापर्यंत अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत.

माण तालुक्यात खरीप हंगामामध्ये पर्जन्यमान व अन्य निकषांच्या आधारे ‘ट्रिगर वन’ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या पिकांची वस्तुनिष्ठ स्थिती निश्चित करण्यासाठी महसूल व कृषी विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचली आहे. तहसीलदार विकास आहिर यांच्या सूचनेनुसार महसूल, कृषी आणि संबंधित यंत्रणांकडून पीक पाहणी केली जात आहे. पंचनाम्यांमध्ये बाधित पिकांची वस्तुनिष्ठ स्थिती नोंदवून नुकसानीची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यावरही प्रामुख्याने भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी बनगरवाडी येथे धर्माजी बनगर यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. सहाय्यक कृषी अधिकारी संजय काळेल आणि गाव कामगार तलाठी योगेश अभंग उपस्थित होते. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नोंद घेण्याच्या सूचना माण तालुक्यातील प्रत्येक गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here