अहिल्यानगर : जिल्ह्यात २७ हजार ८५७ हेक्टरवर आडसाली ऊस लागवड; दुष्काळाचा मोठा फटका

अहिल्यानगर : यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळे धरणातील पाणी उपशावरदेखील निर्बंध आले आहेत. परिणामी दिवाळीनंतर नवीन ऊस लागवड होण्याची शक्यता कमी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, यंदा २७ हजार ८५० हेक्टरवर आडसाली तर ९ हजार ३४८ हेक्टरवर पूर्वहंगामी उसाची लागवड झाली आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता अशा सर्वच तालुक्यांत ऊस लागवड घटली आहे. ऑक्टोबरपासूनच धरणातील पाणी उपशावर घातलेले निर्बंध आणि दुष्काळी परिस्थितीने आडसाली आणि पूर्वहंगामी ऊस लागवड संकटात सापडली आहे. आडसाली उसाचे वर्षभर संगोपन करण्याचेदेखील आव्हान आहे.

जूनच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु जून महिन्यात ६६ मि.मी. आणि जुलै महिन्यात १६१ मि.मी. पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, बाजरी आणि उडदासारखी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. मान्सूनने माघार घेतल्याने परतीच्या पावसावर अवलंबून असणारी पूर्वहंगामी ऊस लागवड पूर्णपणे रखडली आहे. गेल्यावर्षी आडसाली उसाची २८ हजार ८५७ हेक्टर तर पूर्वहंगामीची २८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा ही लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सर्वात कमी पाऊस राहुरी, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात झाला आहे. त्यामुळे तेथील पाऊस अतिशय कमी झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here