अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने व कारखान्याच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी संचालक व तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची सहविचार बैठक झाली. तोटा झाला तरी चालेल, पण तालुक्याच्या हितासाठी कारखाना सुरू ठेवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. किरण लहामटे प्रमुख उपस्थित होते. आमदार लहामटे यांनी अगस्ती कारखाना हा एकमेव तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद राहणार नाही. सर्व मिळून हे शिवधनुष्य आपण पेलू, कारखाना यशस्वी सुरू ठेवू असे सांगितले.
कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर यांनी गळीत हंगाम आढावा सादर केला. कारखाना सुरू राहावा यासाठी आमदार लहामटे व सध्याचे महायुतीचे सरकार एकत्र काम करीत आहेत. असे त्यांनी सांगितले. जालिंदर वाकचौरे, शेतकरी नेते दशरथ सावंत, गिरजाजी जाधव यांनीही आपले मत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष सुनीता भांगरे, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, कैलास वाकचौरे, विजय वाकचौरे, वसंत मनकर, सुधाकर देशमुख, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, राजेंद्र डावरे, प्रवीण मालुंजकर, भाऊपाटील नवले, सुरेश नवले, रमेश जगताप, आनंद नवले, शरद देशमुख, रमेश शिरकांडे, रामहारी तिकांडे, शांताबाई वाकचौरे, प्रा. विलास नवले, संदीप शेटे उपस्थित होते.


















