अहिल्यानगर : वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी, आतापर्यंत २५ अर्ज दाखल

अहिल्यानगर : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत १९ संचालकांच्या जागांसाठी आतापर्यंत २५ अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर या नव्या इच्छुकांचा समावेश आहे. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. तर माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, काशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here