अहिल्यानगर : कर्मवीर काळे कारखान्याचा शुक्रवारी गळीत हंगाम प्रारंभ

अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (दि. ८) रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगाम सोहळ्याच्या प्रारंभप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी सभासद, उद्योग समूहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकत्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्मवीर काळे साखर कारखान्याचे संचालक व कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

कारखान्याचे प्रभारी प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी सांगितले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार आशुतोष काळे व सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येणार आहे. मार्गदर्शक अशोकराव काळे अध्यक्षस्थान भूषवतील. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांचे मार्गदर्शन व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीची उंच शिखरे गाठत आहे. यंदाही गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात पार पडणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here