अहिल्यानगर : ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी पंच महाआक्रोश आंदोलन

अहिल्यानगर : पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने शुक्रवारी दि २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचमहाआक्रोश आंदोलन करण्यात आले. ऊसतोडणी मजुरांची मुकादम, ठेकेदार आणि साखर कारखानदारांकडून होणारी आर्थिक पिळवणूक, शोषण थांबवावे, ऊसतोडणी मजुरांना योग्य मजुरी, आरोग्य सुविधा, सुरक्षित निवास, विमा आणि सामाजिक सुरक्षेचे कायदेशीर संरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंंदोलन झाले.

विद्यार्थी, ऊस तोडणी मजूर, शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि झोपडपट्टीधारकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करुन निदर्शने केली. यावेळी पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांच्या घरांसह जमिनीचे कायदेशीर मालकीहक्क द्यावेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात, खांबळी पाझर तलावातून सुरू असलेला बेकायदेशीर पाणी उपसा आणि वीजचोरी तातडीने थांबवावी, अशा विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादुर प्रजापती, बबलू खोसला, अशोक भोसले, पोपट भोसले, माऊली चांदणे, विलास साळवे, दिलीप साळवे, शंकर साळवे आदींसह शेतकरी, शेतमजूर, कामगार, ऊसतोडणी मजूर सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here