भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या हस्ते नव्याने बसविण्यात आलेल्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याच्या यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर मिल रोलर बसविण्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, नवनिर्वाचित उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, संचालक पंडितराव भोसले, डॉ. नारायण म्हस्के, जनार्दन कदम, अशोकराव मिसाळ, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अॅड. हिम्मतसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी आगामी हंगामासाठी कारखान्याच्यावतीने गतीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून अधिकााधिक ऊस पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सुमनबाई काळे, रंजना तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार एस. डी. चौधरी, एम. एस. मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















