अहिल्यानगर : येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्यात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ संचालक डॉ. प्रकाश घनवट यांच्या अध्यक्षतेखाली आणि शेलार यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याचे नियोजन पूर्ण झाले असून, चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शेलार यांनी यावेळी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांनी सांगितले की, शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील माळरानावर उभ्या राहिलेल्या या कारखान्यामध्ये डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारखान्याच्या संचालक मंडळासह भेट घेणार आहे. गााळप हंगामातील निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि ऊस उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याच्या आर्थिक प्रगतीसाठी डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. यावेळी ज्येष्ठ संचालक त्रिंबक चेमटे, हरिभाऊ दराडे, तज्ज्ञ संचालक आयूब शेख, भाऊसाहेब पोटभरे, हरिभाऊ घोरतळे, जनरल मॅनेजर रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, चीफ इंजिनिअर प्रवीण काळुसे, तीर्थराज घुंगरट, रमेश पालवे, अभिमन्यू विखे, तुकाराम वारे यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


















