अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याची प्रतिष्ठा जपण्याचा शंकरराव गडाख यांचा विश्वास, प्रचाराची सांगता

अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जपलेली मुळा साखर कारखान्याच्या प्रतिमेला बट्टा लागून देणार नाही. सहकार जपण्यासाठी इतर वाईट वाटेला गेलो नाही. अवघ्या बाराशे क्षमतेचा कारखाना आज नऊ हजार गाळप क्षमतेचा केल्याचे सांगून कुठल्याही उसाला १३ महिन्यांच्या आत तोड देऊन गाळप केला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले. मुळा साखर कारखाना निवडणूक प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख होते. रत्नाकर बोर्डे, कडुबाळ कर्डिले, रमेश प्रल्हाद जाधव, रामनाथ महाराज पवार व आश्रुबा सानप यांचे भाषण झाले.

शंकरराव गडाख म्हणाले की, मी जर राजकीय वापर म्हणून विधानसभा निवडणूक काळात नोकर भरती आणि पोकळ घोषणाबाजी केली, तर सहज विजय पदरात पडला असता. मात्र, तसे केलेले नाही. कुणाला आमदारकीचे, तर कुणाला शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याचे सांगून ‘त्या’ उद्योगपतीने विधानसभा ‘मैदानात उतरवून’च दाखवावे, अशी खोचक टीका त्यांनी केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जाधव व बेल्हेकर परिवारातील अवघे दोन सदस्य कुटुंबात ‘मुळा’चे उपाध्यक्षपद दिल्याचे विसरून कुणाच्या तरी नादी लागून खेळ मांडीत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, नंदकुमार पाटील, भाऊसाहेब लांडे, मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मुळा व ज्ञानेश्वर कारखान्याचे बिनविरोध निवडून आलेले संचालक उपस्थित होते. माजी अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रामनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here