अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना तोडणीपूर्वी शेतातच उसाची रिकव्हरी तपासणार

अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने ऊसतोडणीच्या नियोजनात पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या गाळप हंगामापासून ऊसतोड देण्यापूर्वी शेतातच उसाची रिकव्हरी तपासली जाणार आहे. रिकव्हरीच्या आधारे उसतोडणीला प्राधान्य देण्याचे नवे धोरण कारखान्याने स्वीकारले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली. कारेगाव येथे सभापती दीपक पटारे यांच्या वस्तीवर श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सहकारी साखर कारखानदारी अडचणींतून जात आहे. कारखान्यांपुढे अनेक प्रश्न आहेत. जमाखर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी नवे प्रयोग करावे लागतील. यंदा रिकव्हरी तपासून ऊसतोडीला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, ऊस तोडीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस लागवड प्रमाणपत्र दिले जाईल. कोणत्याही सेवा संस्थेने पीककर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास त्याची दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी पेमेंटची सुरक्षितता आणि हमी वाटते, त्याच कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाही विक्रमी ऊस मिळण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, शरद नवले, संजय फंड, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, आशिष धनवटे, रवी पाटील, संजय गांगड, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे, सतीश पटारे, बाबासाहेब पटारे, बाळासाहेब पटारे, डॉ. शंकरराव मुठे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here