अहिल्यानगर : मुळा कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी क्षमतेच्या तिप्पट कर्ज उचलले – शिंदे यांचा आरोप

नेवासे : मुळा सहकारी साखर कारखान्याचे नेट वर्थ (निव्वळ संपत्ती) अवघे १४ कोटी रुपये असताना नियमानुसार दहापट कर्ज घेण्याची मर्यादा म्हणजे १३९ कोटी असतानाही कोणत्याही सक्षम यंत्रणेची आवश्यक परवानगी न घेता तब्बल अधिकचे ३७२ कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचे या अहवालातून दिसून येत आहे. याशिवाय विविध संस्थांची देणीही प्रलंबित आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते तथा पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकरराव यांनी केला. सभासदांच्या स्वखुशीच्या ठेवी असे गोंडस व आकर्षक नाव देत कारखान्याने सभासदांकडून तब्बल १४४ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. या ठेवींना आवश्यक मंजुरी घेतलेली नाही. ऑडिट अहवालात याचा उल्लेख असून अनेक सभासदांना ठेवींचे पासबुकही देण्यात आलेले नाही असे ते म्हणाले.

मुळा सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर या महत्त्वपूर्ण कारखान्यांच्या निवडणुकीदरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी व्यवस्थापनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या पंधरा वर्षांपासून मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असल्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा आवाज दाबला गेला होता. यंदाच्या निवडणुकीत हा दबलेला आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. कारखान्याच्या भवितव्यासाठी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. साखर संघाच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या वार्षिक अहवालाचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे दिसते की, कारखान्याने एनसीडीसीकडून १७९ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. यश मल्टीस्टेटकडूनही ६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलेले असून त्यावरील जवळपास ५ कोटी रुपयांचे व्याज थकित आहे. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेणे हे धोकादायक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here