अचानक लागलेल्या आगीत एक एकरातील ऊस जळून खाक

महराजगंज : निचलौल विभागातील मिश्रौलिया गावात उसाच्या शेताला लागलेल्या आगीत एक एकरातील पिक जळून खाक झाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, आगीचे कारण समजू शकलेले नाही.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आगीत अनाउल्हक अन्सारी, सुरेंद्र, सद्दाम हुसेन यांचा ऊस जळाला आहे. आणखी काही शेतकऱ्यांचा ऊस थोड्या फार प्रमाणात जळाल्याचे सांगण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याची माहिती मिळताच निचलौलचे तहसीलदार वाचस्पती सिंह यांनी लेखपाल फेकू यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here