उत्तर प्रदेश : ऊस पिकात ड्रोनद्वारे औषध, किटकनाशक फवारणीचा उपाय ठरतोय प्रभावी, खर्चात ८० टक्क्यांची बचत

लखनौ : ऊस पिकाच्या लागवडीनंतरचे पहिले १२० दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. उसामध्ये प्रामुख्याने लव्हाळा, कव्हा कुकडूक, मोठा कांस, गाजर गवत आणि हरणखुरी यासारख्या तण पिकाशी तीव्र स्पर्धा करतात, त्यामुळे ऊस उत्पादनात १२ ते ८३ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. या तणांच्या नियंत्रणासाठी लखनौ (उत्तर प्रदेश) येथील भारतीय ऊस संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. राजेश मोदी यांनी ड्रोनचा वापर करण्यासंदर्भात प्रयोग केले आहेत. तेथील कृषी यंत्रे आणि शक्ती विषयाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश मोदी यांनी ऊस पिकात ड्रोन तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या. यासाठी भारतीय ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. एन. सुशील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या संशोधन निष्कर्षानुसार पारंपरिक तण नियंत्रण पद्धतीच्या खर्चाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी बचत होत असल्याचे दिसून आले आहे. ड्रोन फवारणीने फवारणीसाठी लागणारा वेळ, पाण्याची आवश्यकता, फवारणीतील अचूकता, मजुरी व खर्च तसेच दाट पिकातील काम या पाच महत्त्वाच्या बाबींसह मानवी सुरक्षेसह पिकांचे नुकसान या निकषांवर अधिक फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

लखनौच्या ऊस संशोधन संस्थेतील पीक उत्पादन, संरक्षण व कृषी अभियांत्रिकी विभागाच्या शाखज्ञांनी चाचण्या व परिणाम तपासले आहेत. भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या चाचण्यांनंतर या तण नियंत्रण तंत्राची शिफारस करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने १ हेक्टरसाठी ५ ते ६ तास काम करावे लागते. या फवारणीसाठी ५०० ते ६०० लिटर पाण्याचा वापर होतो, त्यातही असमान फवारणी, रसायनांचा अपव्यय याचा धोका असतो. तसेच उंच व दाट उसात फवारणी अत्यंत कठीण जाते. रसायनांचा मानवी शरीराशी चेट संपर्क येऊन आरोग्यास धोका उद्भवू शकतो तसेच पायामुळे पीक व माती दाबली जाऊन नुकसान होऊ शकते. याऐवजी ड्रोन फवारणीमध्ये एक हेक्टरसाठी केवळ २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागतो. तर फक्त ५५ लिटर प्रति हेक्टर पाणी लागत असल्याने ८९ टक्के पाण्याची बचत होते. सूक्ष्म थेंबांद्वारे एकसमान व अचूक फवारणी होते. याला येणारा खर्च प्रति हेक्टर ५०० ते ८०० रुपये आहे. हवेतूनच फवारणी होत असल्याने पीक व माती सुरक्षित राहते. या सर्व बाबींमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि आधुनिक सेन्सर्सन सज्ज असलेले ड्रोन हे अत्याधुनिक उपकरण शेतकऱ्यांसाठी गरजेचे बनले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here