पंजाबमधील शेतकऱ्यांकडून थकीत ऊस बिलाबाबत विचारणा

55

नकोदर : नकोदर सहकारी साखर कारखाना लिमिटेडकडून गळीत हंगाम २०२०-२१ मधील ४४८.१५ लाख रुपयांहून अधिक थकबाकी असल्याने नकोदर, शाहकोट आणि फिल्लौर विभागातील ऊस उत्पादकांकडे संतप्त प्रतिक्रीया आहेत. कारखान्याकडून ऊस बिले देण्यास उशीर होत आहे. नोव्हेंबर २०२० नंतर ऊस उत्पादकांनी ऊस बिलांच्या मागणीसाठी अनेकदा कारखान्याकडे हेलपाटे मारले आहेत. मात्र, तरीही काहीच कार्यवाही झालेली नाही.

याबाबत Punjabnewsexpress.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे संचालक आणि इतर अधिकारीही या प्रश्नाकडे लक्ष देण्यास, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यास तयार नाहीत. कारखान्याचे कार्यकारी संचालक आयपीएस भाटीया यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने १६ फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या उसाचे पैसे दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here