बीड : महेश साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे बिनविरोध

बीड : महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय भीमराव धोंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दोन्ही पदांसाठी इतर कोणताही अर्ज न आल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) भारती ठाकूर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे सहायक निबंधक बाळकृष्ण शिंदे यांनी काम पाहिले.

नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. बैठकीत चेअरमन पदासाठी डॉ. अजय भीमराव धोंडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. व्हाईस चेअरमनपदासाठी पाटणचे सरपंच दादासाहेब जगताप यांच्या नावावरही सर्वांनी सहमती दर्शवली. शिवाजी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. जेष्ठ संचालक नियामत बेग यांनी आभार मानले.या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. या यशाबद्दल डॉ. अजय धोंडे आणि दादासाहेब जगताप यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here